जळगाव राजमुद्रा | राष्ट्रवादी सोडून भाजपला पाठिंबा देणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही वेळेपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्यात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मंत्री खडसे यांच्यासोबत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी देखील अमित शहांची भेट घेतली आहे यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यादरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या राजकारणा संदर्भात तसेच महाराष्ट्रातील विविध राजकीय घडामोडींबाबत अमित शहांसोबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी कळविले आहे. महाराष्ट्रात लोकसभेमध्ये भाजपाला आलेले अपयश याबाबत देखील आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून उपायोजना या विषयावर देखील गंभीर चर्चा झाल्याचे सांगितले गेले आहे. गेल्या अनेक दिवसापासून खडसे यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा सुरू असताना आता अधिकृतरित्या माजी मंत्री खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याने आगामी काळात खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे आणि या सोबतच राज्यात खडसेंवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याचे देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे