जळगाव राजमुद्रा | काल रात्री जामनेर शहरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संतप्त भावना रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असे असे कृत्य नराधमाने केलेले आहे, या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील तितकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे , भावनांना आवर घालावा कोणीही कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही या संदर्भात काळजी घ्यावी तपास यंत्रणेला काम करू द्यावे , दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून तपास करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहे. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्याच्या सूचना मी जिल्हा प्रशासनाला केले असल्याची माहिती आपल्या एकस अकाउंट वर मंत्र गिरीश महाजन यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण
जामनेर तालुक्यातील चेतक निंभोरा या गावात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करण्यात आला एका 35 वर्षीय नराधमाने हे कृत्य केले होते. गेल्या काही दिवसापासून जामनेर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते, मात्र संशयित असलेल्या आरोपीस अटक झालेली नव्हती, स्थानिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग करतात काही तासांमध्ये संशयित नराधमाला भुसावळ येथून तापी नदीपात्राच्या परिसरातून अटक करण्यात आली.
यानंतर जामनेर पोलीस स्टेशन जवळ जमलेल्या जमावाने संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या , अशी मागणी पोलिसांना केली त्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई संशयित नराधमावर करण्यात येईल अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत जाळ – पोळ केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी दगडफेकीमुळे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.