राज्यात लोकसभा निवडणुका अजित पवार गट राष्ट्रवादी व भाजप शिवसेना शिंदे गटाने सोबत लढल्या होत्या मात्र नाशिक शिक्षक मतदार संघात मोठा झटका भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महेंद्र भावसार हे अजित पवार यांचे उमेदवार आहेत तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत भाजपने मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांच्यामुळे निवडणूक मध्ये नुकसान झाल्याचे भाजपाला ठणकावून सांगितले होते. अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का ? असा प्रतिसाद देखील संगणक उपस्थित केला होता या निमित्ताने शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अजित पवार यांना एकटे पाडले जात आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपने शिवसेनेच्या दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदार संघात जबाबदारी देण्यात आली आहे शिंदे सेनेचे किशोर दराडे यांचा महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे मात्र या दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने पाठिंबा न दिल्याने राजकीय तर्फवितर्क लढवले जात आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे महेंद्र भावसार हे वकील व्यवसायात आहेत गेल्या अनेक दिवसापासून ते ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते अजित पवार गटाकडून नाशिक मधून छगन भुजबळ तर जळगाव मधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे.