प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीविकास दोघ असल्याकारणाने त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे अमरावती ग्रामीण पोलिसांना बच्चू कडू यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे कळवले आहे त्यानुसार स्वतंत्र पोलीस पथक तैनात करण्यात आले असून यासंदर्भात योग्य ती चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात आहे यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये चुकीचे मेसेज कोण पसरवत आहे याबाबत योग्य ती शहानिशा करावी असे बच्चू कडू यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना कळवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी आक्रमकपणे राणा परिवारा विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत देखील याचा काही संबंध आहे का ? याबाबत देखील पोलीस चौकशी करीत आहे.
काय आहे पत्रात
बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिल्या पत्रात म्हटले आहे की माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहे अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या प्रकरणा नंतर सकल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जर बंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली आहे. मात्र बच्चू कडू यांच्या जीविताला धोका असल्याची बातमी राज्यभरात पसरल्यानंतर खळबळ उडाली
आहे.