राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मात्र काही भागात अद्याप पर्यंत पावसाला सुरुवात झाली नसल्याकारणाने शेतकरी चिंतेत आहे. महाराष्ट्रात सात जून पासून पावसाला सुरुवात होते मात्र पाहिजे त्या प्रमाणात पावसाचा प्रतिसाद नसल्याने चिंचेचे वातावरण आहे. मात्र हवामान विभागाने शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी दिली आहे. राज्यात येत्या 5 दिवसात मान्सून सर्व दूर बसणार असल्याचे माहिती दिली आहे कर्नाटक केरळ भागात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
पावसाअभावी रखडल्या पेरण्या
मुंबई शहर तसेच परिसरातील भागात पावसाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे यामुळे राज्यात आशेचा किरण शेतकऱ्यांना दिसत आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली या भागात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने विक्रेत्यांची धावपळ होताना पाहायला मिळाले आहे. राज्यात काही भागात अद्याप पर्यंत पाऊस सुरू झाला नसल्याकारणाने शेतकऱ्यांच्या खोडमलेल्या पेरण्या तिच्या पाच दिवसानंतर सुरू होणार आहे काही प्रमाणात निसर्गाकडून शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे.
हंगाम सुरू असल्याकारणाने शेतकऱ्याची पावलं शेतीकडे वळले आहेत पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याने पेरण्या लांबणीवर टाकले आहेत मात्र हवामान विभागाने दिलेल्या दिलासादायक बातमीने शेतकऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाची सुरुवात झाल्यावर पेरणीला सुरुवात होणार आहे. यावर्षी पावसाचा तडाका जोरदार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.