जळगाव राजमुद्रा | पाळधी गावाकडे जाताना जर आपल्याला प्रवास करावा लागत असेल तर अतिशय सावधपणे आपल्याला आपल्या वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या मूल्यवान सामानाची कुठेही किंमत आपल्याला चुकवावी लागेल असे प्रकार घडू नये म्हणून आपला मूल्यवान सामान आपल्याला सांभाळावा लागणार आहे. चोरी करणारी एक टोळी पाळधी बायपास रस्त्यावर सक्रिय झाली आहे.
पारधी बायपास रस्त्यावर काही महिला तसेच अल्पवयीन मुले मोबाईल चोरी तसेच मूल्यवान वस्तू चोरी करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत पोलिसात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाला काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे.
पारधी बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुंबई अथवा धरणगाव मार्गे चोपडा जाण्यासाठी अनेक जन प्रवास करत असतात, परिवारासोबत प्रवास करत असताना अंधाराचा फायदा घेऊन पाच ते सहा जणांची टोळी येऊन थेट धमक्या देऊन खिशातील मोबाईल पैसे तसेच मौल्यवान वस्तू चोरी करत असतात, यामुळे महामार्गावर पोलिसांची ग्रस्त वाढण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांन मधून वाढली आहे.
पोलीस तसेच महामार्ग पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. यामध्ये चोरीच्या उद्देशाने अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे अथवा मोठ्या घटना देखील होण्याची शक्यता आहे. याच रस्त्यावर काही महिन्यापूर्वी दरोडेखोरांचा वावर वाढला होता अनेक घटना या भागात घडल्या आहे.