जळगाव राजमुद्रा | राज्यात ओबीसी आंदोलनाने पेट घेतला असून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहून सरकारने देखील गंभीर दाखल घेतली आहे ओबीसी आंदोलनाकर्त्यांचे मनाने ऐकून घेण्यासाठी राज्य शासनाने मंत्रिमंडळाचा शिष्ट मंडळ नेमला आहे हे सिस्टमंडळ ओबीसी आंदोलकांचे म्हणणे सरकार दरबारी मांडणार आहे ओबीसी आंदोलन कर्त्यांशी बातचीत करण्यासाठी ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ नेमण्यात आले आहे. यामध्ये आता आणखी एका मंत्राचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना या शिष्टमंडळात मुख्यतः जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा फोन
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना सकाळी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील हे तातडीने वाहनाने वडीगोद्रीकडे रवाना झाले आहे सरकारच्या शिष्टमंडळामध्ये गुलाबराव पाटील हे महत्त्वपूर्ण भूमिका निभवणार आहे. वडीगोद्री या गावात ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन आंदोलनकर्त्यांचे आंदोलन राज्यभरात भेट घेताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांना वडीगोद्री येथे तात्काळ दाखल व्हावे यासाठी आदेश केले आहे त्यानुसार राज्याचे पाणीपुरवठा मंत्री शिंदे गटाचे नेते हे जळगाव येथील निवासस्थानी असताना वडीगोद्री येथे रवाना झाले आहे.
मनोज जरंदे यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आरक्षण राज्यभरात सुरू होते मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात यादरम्यान आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले मात्र आता मराठा आरक्षण द्या.. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का नको, म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचा पवित्र देत वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. त्याची दखल आता सरकारने घेतली आहे.