जळगाव राजमुद्रा | सुवर्णनगरी म्हणून जळगाव शहराची ओळख आहे येथील सोन्याला देशभरात विशेष मागणी आहे. त्यामुळे देशभरातून विविध राज्यातून चाकरमानी हे सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव शहरात येत येत असतात सराफ बाजारात तीन दिवसात चांदी 2500 रुपयांनी वधारले आहे त्यामुळे शुक्रवारी चांदी 91 हजार पाचशे रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे यासोबतच सोने ही तीन दिवसात किमान आठशे रुपयांनी पधारून किमान 73 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे आठवड्याच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी मार्केटमध्ये जोरदार उसळी घेतली आहे.
लग्न – बस्त्यासाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक खरेदीदारांचे तोंडचे पाणी पडाले आहे. यामुळे लग्नकार्याचा बजेटही आयोजकांवर वाढणार आहे. किंवा सोने गर्दी करताना जास्त प्रमाणात खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे यामुळे सराफ बाजारात देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे.
या दोन महिन्यांमध्ये सोन्या-चांदीच्या भावात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. मे च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाली होती 94 हजारापर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण व्हायला सुरुवात झाली 14 जून रोजी चांदी 88 हजार पाचशे रुपये गेली तर त्याच्या चार दिवसानंतर अठरा रोजी 89 हजार रुपये आले 19 व 20 जून रोजी प्रत्येकी एक हजाराची वाढ दोघांमध्ये झाली 91 हजार पर्यंत चांदी पोहोचते शुक्रवारी पाचशे रुपयाची वाढ झाली व चांदी 91 हजार पाचशे रुपये प्रति किलो प्रमाणे पोहोचली.