जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । देशात पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. १०६ रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेले आहे. या इंधन दरवाढी विरोधात आज सकाळी डी-मार्ट जवळ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनात माजी आ. मनीष जैन, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, उत्तर महाराष्ट्रीय विभागीय प्रमुख कल्पना पाटील, वकील कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे, विलास पाटील, योगेश देसले, नामदेव चौधरी, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. तर इंधन दरवाढीच्या विरोधात पंतप्रधान यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेवर काही कार्यकर्त्यांनी शाई फेकून निषेध व्यक्त केला. परंतु याठिकाणी उपस्थित पोलीस प्रशासनाने तातडीने संबंधित शाई पुसून टाकली.