राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात वादंग पेटलेला असताना सरकार पुढे अनेक संकट येऊन ठेपली आहे. यामुळे विविध प्रश्नांना सोडवताना भाजपा तसेच शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दमछाक होताना पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार विविध विषयांवर अडचणीचा सामना करत आहे. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे यासाठी विविध स्तरावर सत्ताधारी पक्ष कामाला लागले आहे मात्र आरक्षणाचा तिढा सरकारमध्ये मोठा पेच निर्माण करत आहे.
भाजप पुढे पराभवाचं मोठं मंथन येऊन ठेपला आहे असे असताना निवडणुका तोंडावर आहेत घटक पक्षांच्या येणाऱ्या अडचणी त्या सोडवणे तसेच सामाजिक आराजगता मोठ्या प्रमाणावर पेट घेत आहे. महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती महायुतीच्या सरकारमध्ये महत्त्वाची स्टेरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे सरकार टिकवून ठेवणं आणि ते चालवणे ही महत्त्वाची जबाबदारी भाजपचे प्रक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. आतापर्यंत मराठा ओबीसी आरक्षणाचा विषयाचा सामना करीत असताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी समोर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे आलाय, यामुळे सरकारची अडचण अधिक वाढली आहे.
मराठा आरक्षणावरून बरेच वाद राज्यतरंगले यामध्ये आंदोलन, प्रदर्शन, उपोषण असे अनेक मोठ्या घटना राज्यात घडल्या. यामध्ये मनोज रंगे पाटील यांनी मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे आपल्या मुद्द्याचे समर्थन करताना जयराम पाटील यांनी ” बरेच मुस्लिम असे आहेत … यांचा उल्लेख कुणबी समाजाच्या कागदपत्रांमध्ये आहे. ” पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल वक्तव्य केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीमुळे आणखी एक आरक्षणाचा नवा वाद उभा राहण्याची दाट शक्यता आहे.