जळगाव राजमुद्रा| येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, यामुळे राजकीय पक्ष आपल्या पक्षांच्या जागांची जागेची चाचपणी करत आहे.
मात्र आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. चिन्हावरून शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुळे तुतारीचा खेळ बिघडल्याच्या चर्चेला दुजोरा दिला होता मतदारांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुतारी आणि पिपाणी मध्ये सारखेपणा असल्याने मतदार संभ्रमात पडला याचा फटका म्हणजे पिपाणीला सातारा सह काही भागांमध्ये दीड लाख मतं गेले असून सीट पडण्यासाठी पिपाणी हे चिन्ह कारणेभूत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये निवडणूकिवर वर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल आहे.
शरद पवार गटाच्या दोन उमेदवारांचा पिपाणीमुळे पराभव झाला आहे त्यामध्ये रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांच्या विरोधात श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी श्रीराम पाटील यांचा पराभव झाला. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे, साताऱ्याची सीट 45000 मतांनी पडली आहे यात 37000 मत ‘ पिपानी ‘ ला गेली आहेत. असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला महाविकास आघाडी मधून दहा जागा देण्यात आल्या होत्या यामध्ये जळगाव आणि सातारा या दोन जागा राष्ट्रवादीला गमवावे लागले आहेत ‘ पिपाणी ‘ ने ‘तुतारी’ चा घोळ केला अशी एकच चर्चा या दोन्ही मतदारसंघांमध्ये जोर धरत आहे. यामुळे या या दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या मात्र त्याच जागांवर राष्ट्रवादीला अपयश आल्याने चिन्ह बाबत मंथन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपयश आलेल्या जागांबाबत चाचपणी करायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस गटाला तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष उमेदवाराला टेम्प्लेट म्हणजे पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. सातारा मध्ये उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव केला साताऱ्यात यापूर्वी राष्ट्रवादीची ताब्यात असलेली जागा भाजपच्या ताब्यात गेले आहे त्यामुळे प्रस्थापित राष्ट्रवादीच्या जागेला मुद्दा धक्का मानला जात आहे. साताऱ्यामध्ये पिपाणी चिन्हावर अपक्ष संजय गाडे यांना 37 हजार 62 एवढी मतं मिळाली आहेत त्यामुळे तुतारी समजून मतदारांनी पिपाणीला मत दिलं अशी एकच चर्चा सुरू आहे.