जळगाव राजमुद्रा | जळगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मतदान मिळावं यासाठी पैशाचा वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता त्याची गंभीर दखल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणाचे तातडीचे चौकशीचे आदेश दिले आहे.
कथेत पैसे वाटपाच्या व्हिडिओची जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे या सर्व व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोक नेमके कोण आहेत याबाबत देखील चौकशी होणार आहे जळगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांना याबाबत चौकशी करण्यात यावी असे पत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आदित्य लॉन्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आदित्य लॉन्स येथ पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
विरोधी उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचे साडीवाटप नथनी तसेच कपडे वाटप बाबत तक्रार आलेली नाही अथवा याबाबत मतदार असलेल्या शिक्षकांनी देखील तक्रार केलेले नाही तक्रार आल्यास त्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश
आदित्य लॉन्स या ठिकाणी 22 जूनला झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का ? तसं नसल्यास नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी
सदर चित्रकरणातून दिसून येणाऱ्या इसमाची शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या मार्फत ओळख पाटवावी
सदर सभेदरम्यान झालेल्या चित्रकारणाचे फुटेज तात्काळ ताब्यात घेऊन सदर चित्रीकरणाची भरारी पथकाकडून चौकशी करण्यात यावी
सदर चित्रकरणात पैसे घेऊन जात असल्याबाबतचे अभिलेख जप्त करण्यात यावे अभिलेख गहाळ झाल्यास भारतीय पुरावा अधिनियम 1872 प्रमाणे कारवाई करण्यात यावी.