मुंबई राजमुद्रा | लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी गँगस्टर विजय पलांडे यांनी केली आहे. यामुळे उज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर व पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून फेर नियुक्ती झाल्यानंतर अडचणीत वाढ झाली आहे. या संदर्भात गॅंगस्टर विजय पलांडे यांनी हायकोर्टात याचीका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा झालेले नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
या याचिकेमध्ये गँगस्टर विजय पलांडे याने उज्वल निकम यांच्याबाबत याचीके मध्ये विशेष सरकारी म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती चुकीच असल्याचा म्हटले आहे. निकम यांचे संपूर्णपणे ओळख आता बदललेली आहे त्यांचा उद्देश, अजेंडा, विचार संपूर्णतः वेगळे आहेत. ते भाजपचे मोठे नेते असल्याचे विजय पलांडे यांनी म्हटले आहे.
विजय पलांडे याच्यावर मुंबई येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा आरोप आहे, त्यातील मुख्य आरोपी पलांडे आहे. दिल्ली येथील व्यवसाय अरुण टिक्कू फिल्म प्रोडूसर करणकुमार कक्कड यांच्या हत्येचे आरोपा मध्ये विजय पलांडे आरोपी आहे. निकम हे भाजपचे नेते असल्याकारणाने भाजपच्या अजेंड्याने कामे करतील पक्षाची प्रतिष्ठा जनमानसात उजळण्यासाठी ते पुढील काम करतील. त्यामुळे हायप्रोफाईल प्रकरणात आरोपींना शिक्षा देण्यासाठी कोणत्याही थराला जातील. हे सांगता येत नाही,पलांडे यांच्या याचिकेवर 28 रोजी कामकाज होणार आहे.
उज्ज्वल निकम यांनी आजपर्यंतच्या आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 कैद्यांना जन्मठेपेच्या प्रकरणात यश मिळाले आहे. शासनाच्या बाजूने भूमिका घेत असताना 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. सर्वाधिक चर्चिले जाणारे हायप्रोफाईल केसेस लढवल्यामुळे उज्वल निकम यांना 2009 मधील 26/11 सुनावणी प्रकरणापासून जेड प्लस सुरक्षा दिली. सर्व प्रकरणांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावल्याने भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री देऊन गौरविले आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी अनेक खटल्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राज्यभरात व देशभरात चर्चेला जाणारा 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोट खटला, बॉलीवूडमध्ये दहशत माजवणारा गुलशन कुमार हत्या, राजकीय खडबड माजवणार प्रमोद महाजन हत्या आणि दहशतवाद्यांच्या कृत्याने 2008 मधील मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांनी लढवला होता. तसेच मुंबई शहरात काळिमा फासणार 2013 मधील मुंबई सामूहिक अत्याचार प्रकरण, लहान बालकेवर 2016 मधील कोपर्डी अत्याचार प्रकरणातही ते सरकारी वकील होते