जळगाव राजमुद्रा | जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रत्यय उघडकीस आला आहे. धक्कादायक, म्हणजे पाच दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापक असलेल्या जबाबदार शिक्षकाला लाज लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहात पकडत लाचेची मागणी केल्याने कारवाई केली आहे. यामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे, विशेष म्हणजे ज्या शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक करण्यात आली त्या शाळेच्या शिपायाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे नेमकं शिक्षण विभागात लाच भ्रष्टाचाराचे वाढते लोन कोणाच्या पथ्यावर पडत आहे ? याबाबत संपूर्ण जिल्ह्यात विविध चर्चा रंगत आहे.
वेतन मंजुरी साठी लाच
एरंडोल तालुक्यातील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूल नेपाने ता एरंडोल जिल्हा जळगाव वर्ग ( २ ) च्या शैक्षणिक संस्थांमध्ये या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. तक्रारदार असलेल्या शिपायाचे मागील प्रलंबित वेतन फरकाची रक्कम 2,53 हजार 670 रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग, जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला होता.
तडजोड झाली दहा हजारावर
प्रस्ताव मंजुरीचे काम लाचखोर मुख्याध्यापक आलोसे यांनी स्वतःच्या ओळखीने करून देतो असे म्हटले होते, त्याचा मोबदला म्हणून मंजूर रकमेच्या 5% प्रमाणे 12,500 रुपयाची लाचेची मागणी केली होती, त्यानुसार संबंधित शिपायाने 25. 6. 2024 रोजी लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार पडताळणी केल्यानंतर लाचखोर मुख्याध्यापक आलोसे यांनी वेतन निश्चितीचे आलेले दोन लाख 53 हजार 780 रुपयांचे पाच टक्के प्रमाणे 12,500 ची मागणी केली, मात्र तडजोडअंती १०,००० हजार रुपयाची मागणी केली. 27. 6 . 2024 रोजी लाचखोर आलोसे यांना मुख्याध्यापक कार्यालयामध्ये नेपाणे ता. एरंडोल येथे दहा हजार रुपये लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले होते त्यांच्याविरुद्ध कासोदा येथील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रधार नेमक कोण ?
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर मुख्याध्यापक आलोसे यांना जरी रंगेहात पकडले असले मात्र त्यामधील पडद्यामागचे सूत्रधार नेमकं आहे तरी कोण ? मुख्याध्यापक असलेल्या अलोसे नेमकं कोणाच्या मार्गदर्शनाखाली लाच स्वीकारत होते ? माध्यमिक शिक्षण विभागातील कोणत्या अधिकाऱ्याचा लाचखोर मुख्याध्यापक अलोसे यांना आशीर्वाद होता ? हे देखील स्पष्ट होण्याची गरज आहे.
भ्रष्टाचाराचे लोन पसरतय ?
वेतन मिळवण्यासाठी जर एवढा मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारली जात असेल तर माध्यमिक शिक्षण विभागात आणखी असे काही प्रकार सुरू आहेत का ? माध्यमिक शिक्षण विभागात नेमकं झारीतील शुक्राचार्य कोण आहे ? याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. माध्यमिक शिक्षण विभाग संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विविध स्तरावर शिक्षण व्यवस्था राबवते. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे लोन पसरत चालले आहे याकडे मात्र प्रशासनातल्या वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला
मिळत आहे.