मुंबई राजमुद्रा | भाजपकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या पराभवानंतर पुनर्वसन म्हणून विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे अतिशय भावनिक झाल्याचं पाहायला मिळाला आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे यासाठी पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी देण्यात आले आहे भाजपकडून मुंडे यांनी उमेदवारी अर्ज आज भरला एवढी माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. ” माझ्या कार्यकर्त्याच्या अथक प्रेमामुळे हे शक्य झालं.. त्यांनी मला साथ दिली.. लोकसभेतील माझ्या पराभवानंतर काही जणांनी जीव दिला.. ते माझ्या जिवावारी लागलं.. त्याच समर्थन मी करणार नाही.. पण आज ते थोडे थांबले असते, तर आज ते या जल्लोषात सहभागी झाले असते मला मिळालेली संधी .. आणि जल्लोष.. ज्यानी जीवन संपवलं त्यांना मी समर्पित करते.. असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांना मंत्रीपदा बाबत विचारणा केले असता त्यांनी मंत्रीबाबा पदाबाबत मला कुठलीही अपेक्षा नाही, पक्षश्रेष्ठींनी याबाबत विचार केला असेल तर मला माहिती नाही, मात्र विधान परिषदेवर काम करण्यासाठी मी उत्सुक असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.