मुंबई राजमुद्रा | राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच धामधूम उडाली आहे. मोठ्या प्रमाणात सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. यामुळे शासकीय कार्यालय सेतू सुविधा केंद्रावर जत्रेचे स्वरूप आले आहे.
कागदपत्रांची पूर्तता झाली नाही किंवा काही गोष्टी चुकून सुटून गेल्या तर आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही अशी भीती महिला वर्गामध्ये आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांना निश्चित राहण्याचा आवाहन केला आहे राज्यातील महिला भगिनींनी घाबरून जाण्याची गरज नाही सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल असा आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माता-भगिनींना केले आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पूर्तता करण्यास काही चुका झाल्यास किंवा दिरंगाई केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
एका चैनल वर बुलढाणा जिल्ह्यातील बातमी सुरू होते त्यामध्ये तलाठी ने महिला भगिनी बरोबर अरेरावी केली. महिला भगिनीची गैरसोय केल्यानंतर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला मी तात्काळ त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना दिल्यानंतर कलेक्टरने मला परत फोन केला महिला बघण्याची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असा आश्वासन कलेक्टर यांनी दिला आहे असं माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यातील जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांना कालच सूचना केल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील तहसीलदार , प्रांत, तलाठी ,कर्मचारी असतील या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आम्ही ज्या जिव्हाळ्यांने सुरू केली आहे महिलांना आर्थिक सहाय्य मिळायला हवं वर्षाला 18000 रुपये महिलांना मिळायला हवेत, एक व्यापक विचार घेऊन आम्ही ही योजना सुरू केली आहे.
यासोबत महिला भगिनींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही योजना राज्यातील महिला भगिनींसाठी सुरू केल्या आहेत सर्व प्रशासनाला याबाबत सूचना आहेत शासनाने ज्या आत्मेतेने या योजना सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना मिळायला पाहिजे महिलांची गैरसोय होऊ नये, अडचण होऊ नये, कोणीही पैशांची मागणी करता कामा नये , अशा प्रकारचे सक्त आदेश दिले आहेत. यामध्ये जो लापरवाही करेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलं आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.