मुंबई राजमुद्रा | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फटका बसला काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अधिक प्रमाणात मताधिक्य घेत विजय मिळवला पाहिजे त्या प्रमाणात महायुती तसेच घटक पक्षांना व भाजपला देखील यश मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर भाजपकडून बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही धोका नको म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागला आहे आता भाजपने विधानसभेसाठी प्रतिष्ठापनाला लावली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपाची एस सी , एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली एवढी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहे.
विरोधकांचे नकारात्मक प्रचार प्रसार खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो त्यामुळे विधानसभेत अशा प्रकारे जर नरेटीव्ह वाले , तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे असे सूचना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.