जळगाव राजमुद्रा | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे अशातच अनेक इच्छुकांनी आपल्या भवितव्याचा विचार करीत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे प्रस्थापित राजकीय पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण लॉबिंग करत आहे. आमदार होण्यासाठी जळगाव विधानसभेत अनेक जण इच्छुक आहे यामुळे इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे ” आता किती दिवस थांबायचं विधानसभा लढणारच ” हा विचार करून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विविध शिबिरे कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
जळगाव जिल्हा महायुतीचा गड मानला जातो यामध्ये भाजपची ताकद अधिक आहे. मात्र भाजपमध्ये देखील इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात गटबाजी उभारली आहे. आपापल्या गटाच्या नेत्यांना प्रकाश झोतात आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील असतात तर आपल्याच गटाच्या प्रमुखाला उमेदवारी मिळावे म्हणून आग्रही आहेत. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, आणि काँग्रेस,भाजप अशी सध्या राज्यातील राजकीय प्रस्थापित पक्षांची स्थिती आहे.
प्रस्थापित प्रत्येक पक्षाचे विचार मांडणारा वर्ग जळगाव शहरात आहे यामुळे पक्षाची काही मते फिक्स असल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो याबाबत देखील उमेदवार माहिती घेत आहे. शक्यतो पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. राजकीय पक्षांच्या फुटाफुटीमुळे मतांची गणित मोठ्या प्रमाणात विधानसभेत विभागली जाण्याची शक्यता आहे. फोडाफोडीच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला व महायुतीला राज्यात मोठा फटका बसला आहे. मोठा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधकांना यश मिळाले आहे.
महाविकास आघाडी मध्ये पारंपारिक विधानसभा मतदारसंघ उबाटा सुटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपाचा आमदार जळगाव विधानसभेत असल्याने ही जागा भाजपाला सुटणार आहे. सर्वाधिक इच्छुक उमेदवार भाजपामध्ये विधानसभा लढवण्यासाठी तयारी करीत आहे. महाविकास आघाडीकडून एक उमेदवार तर भाजपकडून एक उमेदवार यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. इच्छुकांची गर्दी अधिक असल्याने काही इच्छुक उमेदवारांनी अपक्ष लढण्याची देखील तयारी सुरू केली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष लढण्याचा पर्याय इच्छुकांनी ठेवला आहे.
धार्मिक, जात अशा विविध वादावर निवडणूक न लढवता स्थानिक मुद्दे तसेच विकासात्मक ‘ व्हिजन ‘ घेउन निवडणुकीला जनतेच्या समोर गेले तर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वादात अपक्षाचे नशीब चमकु शकते असा अंदाज सध्या बांधला जात आहे. जळगाव शहरातील समस्या तसेच थेट जनतेमध्ये असलेला नेमका रोष काय ? अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास केला तर आगामी काळात राजकिय बदल होणे शक्य आहे.
अपक्ष निवडणूक लढवून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वादात कंटाळलेल्या जनतेला पर्याय म्हणून उमेदवारी करायची याबाबत काही इच्छुक जळगाव विधानसभेत चाचपणी करीत आहे. राजकीय पक्षांच्या विविध जाती- पाती व धार्मिक मुद्द्यात न अटकता विकासाच्या मुद्द्यावर तसेच स्थानिक मुद्दे घेऊन जळगाव विधानसभेमध्ये अपक्षांची दादागिरी चालते का ? हे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.