जळगाव राजमुद्रा | जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली, त्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील चार महिन्यांपूर्वी केलेले रस्ते वाहून गेले आहे. ग्रामीण मतदारसंघात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, केवळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टक्केवारी घेतल्यामुळे रस्त्यांची ही स्थिती निर्माण झाली असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. मजूर फेडरेशन येथे माझी पालकमंत्री गुलाबराव देवकरांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देवकरांनी केलेल्या आरोपामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी राष्ट्रवादी सहकार विभागाचे प्रमुख वाल्मीक पाटील, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती.
जळगाव व धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून, त्याला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे.
मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे काम पालकमंत्र्यांकडून केले जात आहे. जिल्ह्यातील ६ हजार ८०० केळी उत्पादक शेतकयांना अजूनही पीकविमा मिळालेला नाही. पालकमंत्री याबाबत बोलायला तयार नाहीत. आता जनता हुशार झाल्याचं माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांनी घेतलेले खोके, केलेली गद्दारी या सर्व गोष्टींचा हिशेब जनता घेणार.पालकमंत्र्यांकडून बलून बंधारे व इतर कामांचे श्रेय घेण्याचा खोटा खटाटोप सुरू केला. पालकमंत्र्यांच्या स्वतःच्या गावातील बसस्थानक देखील माझ्या कार्यकाळात पूर्ण झाले. दहा वर्षे मंत्री असताना, गुलाबरावांनी गावात काय काम केले ? असा प्रति सवाल देवकरांनी केला आहे.
कामाचे श्रेय घेतात
जळगाव ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेची चौकशी करायावल उपसा सिंचनसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला नसतानाही ते या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप देवकरांनी केला. तसेच या कामाचे श्रेय हे आमदार लता सोनवणे यांचे आहे. मात्र, हे पालकमंत्र्यांना सहन होत नसल्याचेही देवकर यांनी म्हटले आहे.