मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यातील गुप्त भेटी आता एकवेळचे सहकारी शिवसेना आणि भाजपा पर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण शिवसेना खा. संजय राऊत यांची आणि भाजप आ. आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची चर्चा आहे. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतातरी मोठा भूकंप होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते.