जळगाव राजमुद्रा | रेमंड प्रशासनाने बळतर्फ केलेल्या कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 18 महिन्यांपासून कामावर रुजू करून न घेतलेल्या कामगारांनी रेमंड प्रशासनाला झाल्यावर धरण्यासाठी लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे. आज 24 जुलै पासून ते 27 जुलै पर्यंत लाक्षणिक धरणे उपोषण निर्माण कंपनीच्या परिसरात करण्यात येणार आहे.
संपाचे बनावट रूप
गेल्या 18 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या रेमंड बडतर्फ कर्मचारी दि २४/२/२०२३ रोजी झालेल्या १२.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या कर्मचारी पगार वाढी च्या मागणी साठी जमा झालेल्या कर्मचाऱ्यांना संपाचे बनावट रूप देण्यात आले होते. कंपनी नियमांचा भंग केल्याचा खोटा टपका ठेवून कर्मचाऱ्यांरी आस्थापनाने खोटे आरोप करून व गुन्हा नोंदवून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले, असा आरोप कंपनी प्रशासनावर कामगारांनी केला आहे. त्या सर्व कामगारांना तात्काळ पुनश्च वामावर तात्काळ घेण्यात यावे अशी मागणी लाक्षणीय धरणे उपोषणादरम्यान करण्यात येणार आहे.
कामगारांनी उपस्थित केले सवाल ?
रेमंड बडतर्फ कामगारांना सुमारे १८ महिन्याचा पगार व फरकासह सन्मानपूर्वक कामावर घेऊन तो परत मिळावा, जळगाव जिल्हयातील लेवापाटीदार, राजपूत, वंजारी समाज, हिंदू आदिवासी ठाकूर या समाजाच्या कर्मचाऱ्यावर झालेला अन्यायाला न्याय मिळावा, कोणतेही बेकायदा कृत्य केले नसताना व निर्दोष असताना सुद्धा त्यांच्यावर हेतू पुरस्कर षडयंत्र वापरून राजकीय हस्तक्षेप करून पोलीस यंत्रणा व आवस्थापन संत्रणा हातात घेऊन कट कारस्थान करून कामावरून काढून टाकले. यामध्ये विशिष्ट समाजाच्या कर्मचाऱ्यावर अन्याय झाला.
कामगारांच्या मागण्या
आमच्या सर्व बडतर्फ निर्दोष कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई व सन्मानपूर्वक कामावर घेऊन आमया उदनिर्वाह भागवणारी नोकरी आम्हाला परत मिळावी , सर्व बडतर्फ कामगार हे अनुभवी व कंपनी च्या हितासाठी काम करणारे कामगार आहेत त्यांना पुन्हा त्याच विभागात रुजू करून कंपनीत पुनश्च कायम करण्यात यावे, हिटलर शाही प्रमाणे १४४ कलम लागून निर्दोष कर्मचा-यांवर राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे व कंपनी व्यवस्थापनाने निर्दोष कर्मचायावर केलेले खोट आरोप मागे घेऊन कर्मचान्यांना न्याय द्यावा अशा मागण्या बडतर्फ कामगारांनी केल्या आहे.