जळगांव राजमुद्रा | श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी शैक्षणिक साजरा होत आहे. हा शैक्षणिक सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत शाळेत शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून मुखवटे तयार केले होते. शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी स्वदेशी खेळाचा आनंद मुलांनी घेतला. सप्ताहात अध्ययन-अध्यापन साहित्य , मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन इको क्लब दिवस, शालेय पोषण दिवस साजरे करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना स्वदेशी खेळाचे महत्व समजावे. म्हणून स्थानिक खेळ दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. हे विविध दिवस मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व पालक वर्ग हे
सहकार्य लाभले आहे.