जळगाव राजमुद्रा | जळगावच्या लाडकी बहीण योजनेच्या संयोजक पदी चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून चेतन शर्मा यांची जळगावच्या लाडके बहिण योजनेच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण अजेंडा असणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्यभरात संयोजकांच्या निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे यामध्ये चेतन शर्मा यांना संधी देण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजने दरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब यामध्ये समन्वयाची भूमिका जनतेत निभवण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संयोजकांची निवड करण्यात आली आहे खास करून महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या योजनेत कुठलीही दिरंगाई होणार नाही, यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर शुभचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी तळागाळापर्यंत काम करावे व योजना यशस्वी अशा शुभेच्छा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.