नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील रामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ८७ हजाराचा गांजा जप्त केला आहे. करीत गुन्हेगारांना मोठा झटका दिला.
तळोदा तालुक्यात रामपुर गावाचे जवळ सतोना गाव शिवारात रेसा नदया पाडवी याने त्याचे ऊसाच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती पोलसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी लगेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करुन आदेशीत केले.
तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांच्या पथकासमवेत जाऊन सतोना गावात खात्री केली. शेतात सर्वत्र ६ ते ७ फुट उंचीचे ऊसाचे पिक व एका शेतात एक इसम संशयास्पद आढळला. त्याने त्याचे नाव रेसा नदन्या पाडवी रा. रामपुर पो. मोदलपाड ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले. शेत त्याच्या मालकीचे असल्याचेही सांगितले. शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीचे हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांचं लागवड केल्याचे दिसून आले, म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण दिड एकर शेती पिंजून काढल असता तेथे ८७ हजार ८२५ रुपये किंमतीची एकुण १६ गांजाची झाडे मिळून आल्याने संशयीत रेसा नदन्या पाडवी यास त्याच्या शेतात मिळुन आलेले गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून ताब्या घेण्यात आले. त्याचेविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये तळोदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार दिपक गोरे, महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, विशाल नागरे मोहन ढमढेरे, तुषार पाटील, रमेश साळुंके, अविनाश चव्हाण, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, दिनेश लाडकर, संजय रामोळे चेतन चौधरी, तळोदा पोलीस ठाण्याचे युवराज चव्हाण, कांतीलाल वळवी यांचा पथकात समावेश होता,