मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातुन अड्चणीत आलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे . या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी राऊतांवर आरोप करत ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांची पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत हे माझ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्याचबरोबर आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळप्रकरणी अटक केली होती . मात्र त्यानंतर या प्रकरणात राऊतांना 9 नोव्हेंबरला जामीन मिळाला होता. परंतु या प्रकरणात आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे.स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिलेली सर्व विधाने बदलण्यासाठी देखील माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचं सांगत एका पत्रावर सही न केल्यास बलात्कार करण्याची आणि त्याचबरोबर शरीराचे तुकडे करुण्याची धमकी आपल्याला कॉलवर मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे .या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान या पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यासाठी धमकी देखील दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. तसेच मागील चार दिवसांआधी स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलं होतं. यातही त्यांनी संजय राऊतांकडून दबाव असल्याचं म्हटलं होतं.आता या प्रकरणाला आणखी काय नवं वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .