मुंबई : .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांनी नुकतीच केंद्रांनी दिलेली झेड प्लस सुरक्षा नाकारल्याच्या चर्चा सुरु असताना आता २ ते ६ सप्टेंबर दरम्यान त्यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे .त्यांचा हा दौरा आता झेड प्लस सुरक्षेसह पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे . या पार्शवभूमीवर राजकीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातर दौरे सुरू केले आहेत. दरम्यान आरक्षणाची स्थिती, गेल्या काही दिवसांंमध्ये सुरू असलेले प्रकार या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुरक्षा व्यवस्था स्वीकारली की नाकारली याबाबतची उलटसुलट चर्चा सुरु असताना आता त्यांचा हा 2 ते 6 सप्टेंबर या काळात होणारा मुंबई ते कोल्हापूर दौरा ‘झेड प्लस’ सुरक्षा कवचाखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान याआधी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्याची (30 ऑक्टोबर) दिल्लीतील शरद पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृह खात्याचे अधिकारी, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी, दिल्ली पोलिस, वाहतूक पोलिस शाखा, अग्निशमन दल, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दिल्ली महापालिका यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सहभागी होते. या बैठकीमध्ये झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना माहिती देण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली पण त्यांनी ती नाकारली. मात्र त्यानंतर आता त्याचा महाराष्ट्र दौरा झेड प्लस सुरक्षा कवचखाली होणार आहे.
दरम्यान या केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेवर शरद पवारांनी मात्र संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र गुप्त ठेवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शरद पवारांसोबत 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्ट मध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना करण्यात आला आहे.दरम्यान शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.