मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली असून महायुतीही आपली सत्ता आणण्यासाठी कामाला लागली आहे.दरम्यान, काल रात्री उशीरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Ekanath Shinde )यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची नागपुरात (Nagpur) महत्वाची बैठक पार पडली. विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात सखोल चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भात महायुतीची रणनीती कशी असावी? जागा वाटपांचा प्राथमिक सूत्र काय असावं? या संदर्भात ही बैठक असल्याची चर्चा झाली आहे.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातून महायुतीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोऱ्यांसह रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात विदर्भात महायुतीच्या जागा वाटपाचं अंतिम सूत्र स्पष्ट होऊ शकलेल नाही . मात्र, विदर्भात भाजप मोठा भाऊ असेल असं भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाला या बैठकीत कळवल्याची माहिती आहे. दरम्यान दुसरीकडे माहिती सामील झालेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी बद्दल नाराजीचा सुरू असल्याचही बोलले जात आहे.निवडणुकांच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी विदर्भातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि योजनांना कशी गती द्यायची या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून, अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एक मत झाल असल्याची माहिती समोर आली आहे.