मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांचे आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू झाले आहे. या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी.पाटील (k. P.Patil )हे देखील महायुतीला सोडविण्याची देण्याच्या तयारीत आहेत. ते कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे ते आघाडीकडून उमेदवारी मिळावी याबाबत पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील उमेदवारी मिळत नसल्याने के पी पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय शिल्लक राहिला आहे. आघाड्यातील सर्वच पक्षांकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे.ते राधानगरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यासाठी त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून ते महाविकास आघाडीत सामील होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र दुसरीकडे राधानगरी मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे के पी पाटलांना आता ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार या चर्चाना उधाण आल आहे.
महायुतीतून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले केपी पाटील आता आघाडीच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.