मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 23 वरून 9 पर्यंत घसरली. या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS)अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपला (BJP)मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवरच आता भाजपने संघापुढे शरणागती पत्करली आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक रणनीतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रतिनिधी सामील करून घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती करण्यात सघांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यासाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत 3 पैकी 2 हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली आहे . येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे.यामध्ये
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या व उघड पद्धतीनं काम करणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या रणनीती ठरवण्यात सघांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
2019 च्या लोकसभेत भाजपनं संघाच्या मदतीमुळ 3 तर महायुतीला 6 जागांवर विजय मिळवला होता. तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपनं एकट्याच्या जीवावर 16 जागा जिंकल्या होत्या.आता या विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.