मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना प्रत्येक पक्षामध्ये आता इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar Group )आणि ठाकरे गटाला (Thackracy group )कर्जत खालापूर मध्ये चांगलाच राजकीय दणका दिला आहे.कारण दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Ekanth Shinde )यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटासह ठाकरे गटाला ही मोठे खिंडार पडल आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी महायुतीतील नेत्यांवरच गंभीर आरोप केला आहे.महायुतीतील घटक पक्षातील काही नेते आपलं आमदार पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं काम सुरू आहे असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महेंद्र थोरवे यांच्यात मतभेद सुरु आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटावर मोठा आरोप केला होता. महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावरच निशाणा साधला होता. राष्ट्रवादी म्हणजे विश्वासघात करणारी पार्टी, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट यांच्यामुळे युतीत नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.
महेंद्र थोरवे कर्जतचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारेही इच्छुक आहेत आणि सुधाकर घारेंना तटकरे पुढे करत असल्याचा आरोप थोरवेंचा आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर मतभेदांचे खटके उडत असल्याच दिसून येत आहे.