मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde )यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये(BJP ) प्रवेश केला आहे.शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर व देवराम भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करून मुख्यमंत्र्यांना धक्का दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. परंतु महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असते. घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटामुळं महायुतीत नाराजी असल्यासचही बोललं जात आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजप अन् शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्ष केले गेल्याचे समोर आले. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, असे दिसून आले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच भाजपने त्यांना मोठा धक्का दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यावर भाजपने ही दावा ठोकला होता. मात्र तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला. त्यानंतरची नाराजी आज निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेल्या भाजप प्रदेशातून दिसून आली. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच भोवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.