राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली असून विधानसभेच्या आचारसंहिते पूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे विधान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून केले होते.या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानपरिषदेच्या १२ जागा, भाजपला ६ तर दोघांना प्रत्येकी ३-३ लवकरच या तिघांची नावे जाहीर केली जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषदेच्या १२ जागा आहेत. त्यापैकी तिन्ही पक्षाला ४-४ जागा येणं अपेक्षित होतं, मात्र, भाजपने ६ जागा घेतल्या अशून शिनसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला ३-३ जागा देण्यात आल्या आहेत.ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधानपरिषदेच्या या १२ जागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. याच गोष्टींचा विचार करून पुण्यासह मुंबईतील या नावाना संधी दिली असल्याची चर्चा होत आहे
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटांनी जोरदार कंबर कसली आहेच.परंतु विधान परिषदेसाठी ही अजित पवार गट जोमाने तयारी लागला आहे.. बँकींग क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांचं मोठं नाव आहे. ते मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं एक प्रतिष्ठाण आहे, त्याच्यामाध्यमातून त्या सामाजिक कार्य करतात, त्यामुळे त्यांना ही संधी दिली जात आहे,
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावे जाहीर करणे अशक्य असल्यामुळे या आठवड्यातच राज्यपालांकडे नावे पाठवावीत, असे सत्ताधारी पक्षाने ठरवले असल्याची माहिती समोर आली आहे.