राजमुद्रा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar )विधानसभा निवडणुकीआधी मैदानात उतरले आहेत. सध्या ते कोल्हापूर दौऱ्यावर असून विधानसभा च्या अनुषंगाने त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात नवी रणनीती आखली आहे. त्यांच्या या कौल्हापूर दौऱ्या दरम्यान भाजपचे नेते समरजित घाटगेSamarjeet Ghatge)यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी समरजित घाटंगे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान महायुतीच्या तीन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील या अजित पवार गटाच्या नेत्यांशी शरद पवारांची भेट घेतली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली. हे तिन्ही नेते राधानगरीतील भुदरगडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर समरजीत घाडगे यांना शरद पवारांनी पक्षप्रवेशावेळी उमेदवारी जाहीर करून टाकली. तसेच महाविकास आघाडीमध्ये ते मोठया पदावर काम करतील असेही त्यांनी सांगितलं. त्यांनी कागल मधील गैबी चौकात हसन मुश्रीफांसमोर मोठ आव्हान उभे केले आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरले पवार मैदानात उतरले असून ठीक ठिकाणी ते दौरे करत आहेत.
तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी शरद पवार संवाद साधत आहेत.या पश्चिम महाराष्ट्रात थोरल्या पवारांनी नवा डावा आखला असल्याच दिसून येत आहे.त्यामुळे येत्या काळात कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता आहे.