राजमुद्रा : यंदाच्या गणेशोत्सवात एमजी रोड मित्र मंडळातर्फे आध्यात्मिक, देशभक्त्ती व समाज प्रबोधनात्मक अशी भव्य दिव्य अशी आरास करण्यात येत आहे. यंदा उज्जैन येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ‘महाकालची आरास यावेळी साकारण्यात येणार आहे. ही आरास भव्य मंडपात उभारण्यात येणार आहे. यात दररोज सकाळी आणि सायंकाळी पुरोहितांकडून भस्म आरती केली जाणार आहे.
एम. जी. रोड मित्र मंडळातर्फे सल्लागार दीपक जोशी यांच्या संकल्पनेतून शरद भालेराव है प्रतिकृती साकारत आहेत. तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची ३ फूट उंच मूर्ती भुसावळ येथून संजय पाटील यांनी बनवली आहे. यापूर्वी मंडळातर्फे जेजुरीचा खंडेराया, वैष्णोदेवी, अमरनाथ गुंफा, शेगावचे गजानन महाराज आदी आरास तयार करण्यात आली होती. मंडळाची नूतन कार्यकारिणीची निवड दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या भव्य दिव्य आराशिसाठी अध्यक्ष सुशांत रहे, उपाध्यक्ष नाना साळी, पराग सरोदे, सचिन निशांत मेहता, सहसचिव ईश्वर पाटील, खजिनदार धर्मेंद्र चव्हाण, मनोज चौधरी, प्रसिद्धी प्रमुख राहुल जगताप, कमलेश देव, जय जोशी, कार्यकारिणी : मनोज तांबट, प्रभुलाल लोहार, बबलू चौधरी, प्रसाद कापडणे, सल्लागार मार्गदर्शक: दीपक जोशी, निखिल जोशी, चंदू जोशी, प्रशांत काळे, सदस्य: गणेश जोशी, कमलेश वाणी, राजू वाणी, जतिन मेहता, विशाल मिस्तरी, योगेश चौधरी, विलास भावसार आदीचे सहकार्य लाभले आहे