जळगाव राजमुद्रा : जळगाव जिल्ह्यामध्ये आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ शकतो.तसेच आगामी काळात सामान्य जनतेत दहशत निर्माण कायद्याचे प्रश्न पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 163(2) नुसार जिल्ह्यात वादग्रस्त ठरणाऱ्या संशयीतांवर कारवाई करण्यात येत आहे.
यांच्यावर होणार कारवाई ?
ही कारवाई शाहूनगर येथील आकाश मनोहर वाघ, नवी पेठ येथील महेश माधवराव पवार, विनोद अशोक कुमार मुंदडा, अमोल राजेंद्र जोशी, मनीष शामसुंदर झवर, सुनील सुरेश जोशी, अजय कुमार सूर्य चंद्र गांधी, गोविंद शामसुंदर पंडित, गौरव उमेश साखला, आयुष अजय गांधी, तसेच बळीराम पेठ येथील गौरव लक्ष्मीकांत राणा, रुपेश राजेंद्र पाटील, राहुल गजानन घोरपडे, विपिन दीपक पवार, अश्विन सुरेश भोळे तसेच लिधुरवाडा येथील कल्पेश कैलास सोनवणे, कैलास नारायण सोनवणे तर कुसुंबा येथील चंद्रकांत बळीराम पाटील या सर्वांना जळगाव शहरातून बाहेर घालून देण्यात येऊ नये याबाबत उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभागात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांनी जर उपस्थित न राहिल्यास संशयीतांचे कारवाईबाबत काही म्हणणे नाही असे समजून एकतर्फी कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
संबंधितांवर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे. अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा प्रशा