राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde )यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस शेतकरी पाऊस, अंगणवाडी तसेच इतर विविध विभागासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा ३६ हजार ९७८ केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे पारेषण विरहित (बॅटरीसह) सौर संच टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत.
या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहिरी,शेततळे आणि विज जोडणी साठी भरीव अनुदान मिळणार आहे.आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीत चार लाखापर्यंत जुन्या विहिरीचा दुरुस्ती एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
तसेच सध्याच्या पुणे शिरूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाचे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ करण्यात येणार आहे. धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे खास बाब म्हणून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करण्यास व काटोल आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच राज्यात सरासरीच्या 2121% पाऊस झाला असून 102% पेरण्या झालेत अशी माहिती कृषी विभागाने राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. अशा विविध विभागासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.