राजमुद्रा : तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे (Eknath khdse )आता पुन्हा स्वगृही परतण्याच्या चर्चांना उधान आलं होतं.मात्र अजूनही त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवरच आता एकनाथ खडसेनीं मोठा खुलासा केला आहे. आपल्या अधिकृत प्रवेशाला महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा विरोध आहे, असं सांगत त्यांनीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis)आणि मंत्री गिरीश महाजन( Girish Mahajan)यांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
खडसेनीं थेट नाव घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.काही अडचणींमुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अडचणी अजून आहेत. तसं आश्वासन मला भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र भाजपला तर माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार आहे”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली आहे. पक्षप्रवेशावर त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते. त्यासंदर्भातील निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर केला होता. परंतु अजूनही त्यांना भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. यामुळे मी आता पुढचा विचार करेल किंवा माझ्या राष्ट्रवादीचे काम करेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान,आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत राहतात की? भाजपात जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.