जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता लोकशाही दिनाचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना लोकशाही दिनात उपस्थित राहायचे असल्यास नियमांचे पालन करायचे आहे, असे मनपा सूत्रांनी सांगितले.