राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम (Ramdas Kadam ) यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना घरातूनच आव्हान मिळणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी बालेकिल्ला असलेल्या खेड दापोली मतदारसंघात सख्खा-चुलत भाऊच रामदास कदम यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा राजकीय सामना पहायला मिळणार आहे.
रामदास कदम यांनी महायुतीत असूनही अनेकदा महायुतीला अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार कंबर कसली असून आता घरातूनच आव्हान मिळाले नाही त्यांना मोठा धक्का बसला आहे.काही वर्षांपासून खेड-दापोली मतदारसंघावर रामदास कदम यांच वर्चस्व आहे. सध्या त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे खेड दापोली मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट असा सामना रंगणार आहे.
खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावले आहेत. अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोहोचला आहे.. दापोली विधानसभेत कदम यांना कदमांचेच आव्हान असणार आहे.