राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.
यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली असून आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जागावाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सोलापूर काँग्रेसकडून (Solapur Congress) सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता शरद पवार गट आणि माजी आमदार नरसाय्या आडम या बाबतीत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीनुसार शहर उत्तर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मदत केली होती. त्यामुळं आडम यांना शहर मध्यमधून लढण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावा केला होता. आता सोलापूर काँग्रेसने विधानसभेच्या जागांसाठी केलेल्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडणार आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांनी तसचे इच्छुकांनी देखील गाठी भेटी, संवाद, दौरे काढण्यास सुरुवात केलीय. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असेल किंवा महायुती असेल दोन्हीकडे देखील अद्याप जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे विजयी झालेल्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा करण्यात आला आहे.सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर देण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे.
आता काँग्रेसच्या या दाव्यामुळं महाविकास आघाडीतील घटकपक्ष काय भूमिका घेतात? हे पाहावे लागणार आहे.