मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्या शिवसेनेकडून मोठा मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या राज्यातील 42.80 लाख महिलांपर्यंत थेट पोहोचण्याचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी केली असून यासंदर्भात सोमवारी वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभेमध्ये फायदा घेण्यासाठी तीनही पक्षांनी कंबर कसली आहे.
यासाठी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही जलसलमान यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. या यात्रेतून जास्तीत जास्त महिला पर्यंत पोहोचण्याचा नियोजन केला आहे. जर्मन सोमवारी होणाऱ्या वर्षांमध्ये बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक आमदार आणि जिल्हाप्रमुखासोबत चर्चा करणार आहेत. जे लोक या बैठकीला हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासोबत झूम मिटिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे.
..दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घरापर्यंत, मतदारापर्यंत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. योजनेचा आपल्याला जास्तीत जास्त राजकीय फायदा व्हावा यासाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेने त्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला असून त्या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.