राजमुद्रा : जागतिक फिजिओथेरेपी दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. यात शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासंदर्भात जिल्ह्यात अनेक अनधिकृत फिजीओथेरेपीस्ट आहेत, त्यामुळे अनेकदा नागरीकांच्या अवयवांना इजा होण्याचे प्रकार होतात, असे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील ५० डॉक्टरांना जिल्हा फिजिओथेरेपी असोसिएशनचे ओळखपत्र दिले आहे. त्यामुळे फिजिओथेरेपी तज्ज्ञांकडे गेल्यास प्रथम त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करा, तेव्हाच फिजीओथेरेपीची ट्रिटमेंट घ्या, असे आवाहन जिल्हा फिजिओथेरेपी असोसिएशनचे सचिव डॉ. आदित्य खाचणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यात सेंट जोसेफ, किड्स गुरुकुल, रेल्वे हॉस्पीटल भुसावळ येथे फिजीओथेरेपीबाबत प्रचार- प्रसार करण्यात आला.
जिल्ह्यात अनधिकृतपणे अनेक जण रुग्णांना सल्ले देत असतात. त्यात रुग्णांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नागरीकांनी फिजिओथेरेपी तज्ज्ञांकडे फिजिओथेरेपी असोसिएशनचे ओळखपत्र आहे की नाही. याबाबत चौकशी करा असे आवाहन डॉ. खाचणे यांनी केले आहे.
…यावेळी जिल्हा फिजीओथेरेपी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.श्रीवल्ली वाघदे, उपाध्यक्ष डॉ. रिजवान शेख, खजिनदार डॉ.मनी मुथा, डॉ. श्वेता पाटील, समन्वयक डॉ. धनश्री भोईटे आदी उपस्थित होते.