राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर मुंबईत राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे… विशेष म्हणजे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सह्याद्री वर बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीच्या (Mahayuti Meeting) नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सल्ले दिले. लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुका टाळा. विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यांमसोर ठेवा, असे त्यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितले.
1. महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, जाहीर वाद टाळा.
2. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा.
3. जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निवडा.
4. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या.
5. महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा, एकजूट दिसेल, याची काळजी घ्या.
6. राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
7. भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्या जागांबाबत योग्य निर्णय घ्या.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांनी भाजपचा काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात असून महायुतीच्या अनेक नेत्यांनी तसेच संकेत दिले आहेत त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.