राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी रणनीती आखली असून भाजप नेते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. याआधी
समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
.वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार आहे.
.बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी महायुतीशी हात मिळवणी केले आहे.अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत.