राजमुद्रा : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लाडक्या बापाच्यानिमित्त नेत्रतज्ञ डाॅ. शितल खर्चे अॅडमिनिस्टर यांच्या संकल्पनेतुन नेत्रज्योती नेत्रालय, जळगाव यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे आज मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .
या शिबिराचे उदघाटन नगरसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबीराचा शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी व परीसरातील नागरीकांनी लाभ घेतला.