राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र राजकीय दृष्ट्या चांगले चर्चेत आले आहेत. यामध्ये चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट शिवसेनेत दाखल झालेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी एकमेकांविरुद्ध विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघात होत असलेल्या भोंगळ कारभाराविरुद्ध पत्रकार परिषद घेत चेअरमन असलेल्या मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले त्यामुळे दोघांचे वाद चांगले टोकाला गेले आहे. दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा देखील आरोप उन्मेष पाटील यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या दुधाला अद्याप पर्यंत फरकाची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांना थेट हिनवले. आता हा वाद राजकीय आखाड्यात दिसून येणार आहे.
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी गिरणा नदीच्या नारपार प्रकल्पावरून आंदोलनाचा पवित्रा घेतला यामुळे ते चांगलेच राज्यभरात प्रकाश होतात आले आहेत तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील अनेक विकास कामे व सामाजिक उपक्रमातून जिल्ह्यात अधिक चर्चेत आहे.
आगामी काळात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने दोन मित्राचा राजकीय संघर्ष जळगाव जिल्ह्याला बघायला मिळणार आहे.चाळीसगाव मध्ये होणारी लढाई ही राजकीय नव्हे तर आता व्यक्तिगत झाल्याचा दिसून येत आहे. भाजप अथवा ठाकरे गट शिवसेना अशी लढाई न होता दोन कट्टर वैरी मित्रांची संघर्षाची लढाई चाळीसगाव मध्ये होणार आहे. नेमकं या संघर्षात कोण बाजी मारेल ? हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे.