राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड असलेल्या जळगाव शहरात ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.ठाकरे शिवसेनेकडून माजी महापौर जयश्री महाजन व माजी उपमहापौर कुलभूषण पाटील विधानसभेच्या तिकिटाच्या स्पर्धेत आहे.. या निवडणुकीसाठी मराठा, मुस्लिम आणि दलित या मतदानावर महाविकास आघाडीचा डोळा आहे. कोणत्याही स्थितीत हे तिन्ही मतदार एकत्र करून भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी मधील नेते सावध पाऊल टाकत आहेत. आता या मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या कालखंडात माजी मंत्री सुरेश जैन शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील 22 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या रणनीतीमध्ये जळगाव ही तितकेच महत्त्वाचे आहे कारण या जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेत झालेल्या बंडखोरी मध्ये सर्वाधिक अव्वल राहिलेला आमदारांचा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याकडे बघितले जाते म्हणून पुन्हा एकदा ठाकरे च्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव मध्ये पक्ष प्रमूख ताकत लावतील हे निश्चित आहे.
विद्यमान आमदार राजू मामा भोळे हे दोन वेळा जळगाव विधानसभेवर निवडून गेले आहेत भाजपाला जळगाव शहरात शह देण्यासाठी ठाकरे गट लेवा समाजातील चेहरा देत की मराठा समाजातील यामुळे पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहे. लेवा समाजातून असणाऱ्या भाजपकडून आमदार राजू मामा भोळे यांना जर पुन्हा संधी मिळाली तर ठाकरे गट लेवा समाजाचा चेहरा पुढे करू शकतो, भाजपने मराठा कार्ड खेळले तर ठाकरे गटाकडून कुलभूषण पाटील यांना संधी मिळते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे