राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (ajit pawar Group )जोरदार कंबर कसली असून जनसन्मान यात्रेतुन प्रत्येक मतदारपर्येंत पोहचण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाने आदेश दिला तर आपण अकोट विधानसभा निवडणूक लढू असं वक्तव्य केल आहे. त्यामुळे आगामी विधानसभारिंगणात ते उतरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या निवडणुकीसाठी यवतमाळमधील सातपैकी तीन जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून करणार असल्याचंही ते म्हणाले. अमोल मिटकरी हे यवतमाळच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं. जिथे राष्ट्रवादी मजबूत आहे तिथं जागा मागणार असंते म्हणाले.. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गुलाबी रंगातील जॅकेटमध्ये दिसतात. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गुलाबी रंग लोकांना आवडतो तो रंग लोकांना आकर्षित करतो म्हणून सध्या तो रंग वापरला जातोय. कुठल्या बाबा बुवाचा ऐकून तो रंग वापरला जात नाही.
जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात किती त्रास होतोय हे त्यांच्या वेदनेवरून समजून घेत आहोत. सध्या तुतारी गटाचा एक नवीन युवक नेतृत्व करायला लागलाय आणि त्याचा जयंत पाटील यांना त्रास होतोय. त्यांच्या मनस्थितीतून त्यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्यं केली जातात असं अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जोरदार कंबर कसली असून या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.