राजमुद्रा : राज्यभरात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार कंबर कसली आहे. अशातच ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे. त्यांची ही निवड करत भाजपने विरोधी पक्षांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच ताप होणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली समिती जाहीर करण्यात आली आहे. किरीट सोमय्या याना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात होतील असे संकेत महायुतीच्या नेत्यांनी दिले आहे. या निवडणुकीसाठी माहिती आणि महाविकास आघाडी चांगलीच तयारीला लागली आहे. यात भाजी कोण मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.