राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारकडून जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडला जात आहे. शिंदे सरकारने चार दिवसात 370 जीआर काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा आपले सरकार यावे यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
राज्य आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागल्या असताना सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल योजना उचलल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यापासून जीआरची संख्या वाढत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी जाहीर झाल्या तेव्हाही जीआरची संख्या खूपच मोठी होती आणि आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने घोषणांचा पाऊस सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,महायुती सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या नऊ दिवसात तब्बल 484 सरकारी आदेश म्हणजे जीआर तयार केलेत त्यापैकी चार,पाच, सहा आणि नऊ सप्टेंबर या चार दिवसात सरकारने 370 जीआर काढले असून त्यामधील चार,पाच सप्टेंबरला सरकारने प्रत्येक 118 जीआर जारी केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माहिती आणि महाविकास आघाडी सजीव झाली असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर योजना साठी प्रशासकीय मान्यता दिली जाऊ शकत नाही परंतु चालू जीवनासाठी आर्थिक वितरण सुरू ठेवता येईल असे म्हणणे आहे.